Coronavirus Updates l महाराष्ट्रात आढळले ५ हजार ६४० कोरोना रुग्ण,१५५ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ लाख ४२ हजार ९१६ रुग्णांना डिस्चार्ज

maharashtra-reports-5640-new-covid-19-cases
maharashtra-reports-5640-new-covid-19-cases

मुंबई l कोरोनाचा हाहाकार पुन्हा वाढत चालला आहे. आकडेवारीवरून दुस-या लाटेकडे वाटचाल सुरु झाली असे स्पष्ट होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ५ हजार ६४० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.Coronavirus Updates महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५५ मृत्यूंची नोंद झाली आहे.5640-new-covid-19-cases

दरम्यान मागील २४ तासांमध्ये ६ हजार ९४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ लाख ४२ हजार ९१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८९ टक्के झाला आहे.

राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा l Schools Reopening l शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, जिल्हा प्रशासनाला दिली जबाबदारी

सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ४ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७८ हजार २७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ५ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी झाली आहे.

हेही वाचा l उभ्या ट्रकवर जीप आदळून १४ व-हाडी ठार,कटरने पत्रा कापून मृतदेह काढली बाहेर

आज नोंद झालेल्या १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ९१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here