Kirit Somaiya : किरीट सोमय्या नालायक माणूस, अरविंद सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

aravind-sawant-on- Kirit Somaiya -allegations-on-rashmi-thackeray-19-bunglow-news-update-today
aravind-sawant-on- Kirit Somaiya -allegations-on-rashmi-thackeray-19-bunglow-news-update-today

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत, हे सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.

रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. आम्हाला आतापर्यंत येथे बंगले आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. तर संबंधित ठिकाणी बंगले नाहीत, असं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे सदर जागेवरील बंगल्यांचं काय झालं? याची चौकशी करावी,” अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांकडे केली आहे.

किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “किरीट सोमय्या हा काही महात्मा नाही. याआधी त्यांनी केलेल्या आरोपांचं काय झालं? किरीट सोमय्या हा लायकी नसलेला माणूस आहे. त्यांनी आधी केलेले आरोप सिद्ध करायला लावा, अशी खोचक टीका सावंतांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

 यावेळी प्रसारमाध्यमांना उद्देशून अरविंद सावंत म्हणाले की, “तुम्ही हा धंदा आधी बंद करा. किरीट सोमय्या हा काही महात्मा नाहीये. त्याला आधी प्रश्न विचारा की, त्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आणि जे त्यांच्या पक्षात गेले, त्याचं काय झालं? हे तो सांगत नाही. तोपर्यंत किरीट सोमय्याच्या कोणत्याही वक्तव्याची दखल मी नव्हे तर कुणीच घेऊ नये, असं मला वाटतं.

ज्यांना आपण नालायक म्हणतो अशी ही लायकी नसलेली माणसं आहेत. त्याला तुम्ही दत्तक का घेतलंय हेच मला कळत नाही. तुम्ही दत्तक घेणं बंद करा. सोमय्यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, ते सिद्ध करायला लावा, ते तुमच्या लॉंड्रीत कसे स्वच्छ झाले? ते आधी सांगा…, मग दुसऱ्यांवर आरोप करा,” अशी खोचक टीका अरविंद सावंतांनी केली.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here