Thane Prime Critical Hospital Fire l ठाण्याच्या मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत

प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला.

fire-in-thane-mumbra-hospital-4-patients-in-icu-ward-died-during-transfer-to-other-hospital-says-municipal-corporation
fire-in-thane-mumbra-hospital-4-patients-in-icu-ward-died-during-transfer-to-other-hospital-says-municipal-corporation

ठाणे: कोरोनाचा कहर सुरु असतानाच रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी ताज्या असताना ठाण्यात दुर्दैवी घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.fire-in-thane-mumbra-hospital-4-patients-in-icu-ward-died-during-transfer-to-other-hospital-says-municipal-corporation

यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्कजवळील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते.

हेही वाचा : महाराष्ट्रातून सुटणा-या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.