लग्नासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघात; 3 जणांवर काळाचा घाला

Truck- cruzer-accident with wedding vehicle 3 killed on the spot 7 injured in aurangabad
Truck- cruzer-accident with wedding vehicle 3 killed on the spot 7 injured in aurangabad

औरंगाबाद : राज्यात चार दिवसांपासून भीषण अपघाताची मालिका सुरुच आहे. औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यातील कन्नड kannad शहरात लग्नासाठी निघालेल्या गाडीचा भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि क्रूझरमध्ये हा अपघात Truck-cruzer accident in kannad झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ या दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून तात्काळ पोलिसांच्या मदतीने 7 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून तीन जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तर सदर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. लग्न समारंभासाठी निघालेल्या गाडीवर काळाचा घाला बसल्याने कुटुंबियांमध्ये दुखाचं वातावरण आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघाताचा पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा: 

उद्योजक अतिक मोतीवाला यांना महिलेकडून ब्लॅकमेल; ११ लाख, फ्लॅटही उकळला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here