US Presidential Election Results l बायडेन आघाडीवर,जॉर्जियात पुन्हा मतमोजणी सुरु

georgia-to-recount-us-presidential-election-vote
georgia-to-recount-us-presidential-election-vote

वॉशिंग्टन Washington l अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अद्यापही पेच कायम आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरूच आहे. बराक ओबामा Barack Obama यांच्या कार्यकाळात सलग आठ वर्ष उपाध्यक्ष Vice President of the United States राहिलेले जो बायडेन Joe Biden डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या विरोधात अध्यक्षपदाच्या United States Presidential election, 2020 निवडणुकीत आघाडीवर आहेत.

मतमोजणीवरुन ठिकठिकाणी वाद सुरू आहेत. जॉर्जियात नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय झाला. या प्रक्रियेमुळे निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

ताज्या आकडेवारीनुसार बायडेन अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक बहुमताच्या जवळ पोहोचले आहेत. (Georgia To Recount US Presidential Election Vote) अमेरिकेत किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवणाऱ्याची अध्यक्षपदी निवड होते.

जो बायडेन Joe Biden यांनी २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. 

जो बायडेन Joe Biden २००९ ते २०१७ या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या कार्यकाळात बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते. ओबामांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. निवडणुकीत पराभव झाल्यास अमेरिकेच्या व्यवस्थेनुसार २० जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प पदमुक्त होतील आणि बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील.

फिलाडेल्फिया येथे मतमोजणी केंद्राजवळ दोन बंदुकधाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बंदुका जप्त करण्यात आल्या. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.

पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अॅरिझोना येथील मतमोजणी अद्याप सुरू आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी बायडेन आघाडीवर आहेत. याच कारणामुळे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला तरी बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता दिसत आहे. 

बायडेन यांच्या विजयाचे चित्र असल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात Democratic Party आनंदाचे वातावरण आहे. तर ट्रम्प यांच्या पराभवाची शक्यता दिसू लागल्यामुळे रिपब्लिकन पार्टीचा Republican Party मतमोजणीतील उत्साह मावळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा l भाजपाचा अर्णब गोस्वामी प्रकरणावरून मानसिक विकलांगतेचा तमाशा;शिवसेनेचा हल्लाबोल

ट्रम्प यांनी मतमोजणीत गडबड सुरू असल्याचे आरोप करुन न्यायालयात धाव घेतली आहे. काही ठिकाणी न्यायालयीन आदेशामुळे नव्याने मतमोजणी सुरू आहे. मात्र बायडेन यांनी विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात व्हाइट हाऊससमोर एक मोठा ट्रक दिसत आहे. या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडीओवरुन ट्रम्प यांची आवराआवर करुन व्हाइट हाऊस सोडण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here