इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा गोंधळ; हिंसाचारात १५३ जणांचा मृत्यू!

153-people-killed-in-riot-football-match-in-indonesia-news-update
153-people-killed-in-riot-football-match-in-indonesia-news-update

इंडोनेशियातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार घडला आहे. या हिंसाचारात १५३ जणांचा मृत्यू झाला असून, १८० च्यावरती लोक गंभीर जखमी झाले आहेत. इंडोनेशियातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला.

त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत १५३ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here