Aryan Khan Bail Hearing: आर्यनला बेल की पुन्हा जेल?,जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी!

aryan-khan-bail-granted-latest-news-bombay-high-court-allows-bail-to-shah-rukh-khan-son-arbaaz-merchant-and-munmun-dhamecha-mumbai-cruise-drug-party-ncb-news
aryan-khan-bail-granted-latest-news-bombay-high-court-allows-bail-to-shah-rukh-khan-son-arbaaz-merchant-and-munmun-dhamecha-mumbai-cruise-drug-party-ncb-news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) अटकेत असलेला शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे (Aryan Khan Bail Hearing). तसेच आर्यनसोबत अटक असलेली मुनमून धमेचाच्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी होणार आहे. बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसह आणखीन अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर जामीन देण्यास नकार दिल्याच्या एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या वकिलांनी धाव घेतली.

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, ‘उच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल असे स्पष्ट केले.’ यावेळेस उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती आर्यनच्या वकिलांकडून करण्यात आली. मात्र न्यायालयात नकार दिला.

यादरम्यान आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून बॉलिवूड नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आले. गुरुवार, शुक्रवार सलग दोन दिवस अनन्याची चौकशी एनसीबीने केली. मात्र काल, सोमवारी पुन्हा अनन्याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. मात्र वैयक्तिक कारणास्तव अनन्या एनसीबी चौकशीसाठी हजर राहिली नाही. 

पण आर्यन खानच्या या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. याप्रकरणातील एनसीबीचा मंच प्रभाकर साईलने गंभीर आरोप केले आहे, त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील एनसीबीचे तीन अधिकारी मुंबईत येणार असून वानखेडे यांना दिल्लीत ताबडतोब बोलवण्यात आले आहे. त्यानुसार वानखेडे काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र आज आर्यन खानला जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here