Lakhimpur kheri : लखीमपूर खेरी इथली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड – शरद पवार

भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच

Ncp-president-sharad-pawar-on-lakhimpur-kheri-priyanka-gandhi-modi-government-up-government-yogi-adityanath-news-update
Ncp-president-sharad-pawar-on-lakhimpur-kheri-priyanka-gandhi-modi-government-up-government-yogi-adityanath-news-update

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) इथं शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपा विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, मोदी सरकार किंवा उत्तरप्रदेश सरकारकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष (Ncp President) शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार असो वा उत्तरप्रदेश सरकार असंवेदनशील आहे, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, “या हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्याची जवाबदारी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच पूर्णपणे आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास,चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश मार्फत चौकशी झाली पाहिजे.

दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येत आहे. आज त्यांच्याकडे हुकूमत आहे म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सफल होणार नाही. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. शेतकऱ्यांनो, भले तुमच्यावर हल्ला झाला असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत”.

“केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाहीये.जालियनवाला बाग मध्ये कशी परिस्थिती झाली होती तशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे”, असंही पवार म्हणाले.

शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, “दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरू आहे, मात्र २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या.

लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर इथं जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आमच्या मागण्या मांडत होते. मात्र त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here