गोवा, उत्तराखंडमध्ये आज 110 जागांसाठी मतदान

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत.

karnataka-assembly-poll-2023-dates-declared-by-election-commission-press-conference-news-update-today
karnataka-assembly-poll-2023-dates-declared-by-election-commission-press-conference-news-update-today

नवी दिल्ली: गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे.  गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत.  या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती.  मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे.

गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आहे.

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.  गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत़  राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या़  मात्र, भाजपने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता.

उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आहे.  राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत.  काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत.  गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होते.

काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या. उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान होणार असून, ५८६ उमेदवार रिंगणात आहेत.  सहारणपूर, बिजनौर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बरेली आणि शाहजहानपूर आदी जिल्ह्यांमध्ये हे मतदान होईल़  गेल्या निवडणुकीत भाजपने ५५ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या़ 

६० हजार पोलीस तैनात 

उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५००० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.  तिथे ६० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  तसेच निमलष्करी दलाचे शेकडो जवान तैनात आहेत़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here