बिहार विधानसभा निवडणुकीतील Bihar-Elections-2020 पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी मतदान होत आहे. १०६६ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुध्द राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीत चुरस
राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात चुरस आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी संयुक्त जनला दल ३७ तर भाजपा २९ जागा लढत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाने ४२ ठिकाणी उमेदवार उभे केले असून त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस २० ठिकाणी लढत आहे.
पहिल्या टप्प्यात २.१४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार
पहिल्या टप्प्यात २.१४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १.१ कोटी महिला आणि ५९९ तृतीयपंथी आहेत. दरम्यान करोना संकटात इतकी मोठी निवडणूक घेणारं बिहार पहिलं राज्य ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये जवळपास ७.२९ कोटी मतदार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.
मोदींचं ट्विट करुन मतदानाचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बिहारमधील नागरिकांना सुरक्षेची काळजी घेत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंग नियमांची मोदींनी आठवण करुन दिली आहे.
बिहार विधानसभा चुनावों में आज पहले दौर की वोटिंग है।
सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे कोविड संबंधी सावधानियों को बरतते हुए, लोकतंत्र के इस पर्व में अपनी हिस्सेदारी सुनिश्चित करें।
दो गज की दूरी का रखें ध्यान, मास्क जरूर पहनें।
याद रखें, पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2020
बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांमध्ये
बिहार विधानसभेची निवडणूक Bihar-Elections-2020 २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.
राहुल गांधीचे मतदारांना आवाहन
रोजगार,न्याय आणि शेतकरी,कामगारांच्या हितासाठी यंदा मतदान महाआघाडीला करा. अशा प्रकारे राहुल गांधी यांनी ट्विट करुन बिहारच्या जनतेकडे मागणी केली आहे. तसेच आज बिहार बदलणार असा उल्लेख करुन सर्वांना मतदानासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
इस बार न्याय, रोज़गार, किसान-मज़दूर के लिए
आपका वोट हो सिर्फ़ महागठबंधन के लिए।बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ।#आज_बदलेगा_बिहार
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2020
या Bihar-Elections-2020 निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजपा यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
Voting for the first phase of #BiharElections underway; visuals from a polling station in Gaya pic.twitter.com/LOlxKLX09J
— ANI (@ANI) October 28, 2020
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या प्रचारसभांचा धडाका
पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असताना Bihar-Elections-2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या प्रचारसभा पार पडणार आहेत.
हेही वाचा l Cucumber Benefits l काकडीबरोबरच बिया खाण्याचे ११ गुणकारी फायदे
नरेंद्र मोदी यांच्या दरभंगा, मुझफ्फरपूर, आणि पाटणा अशा तीन ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर अस्थान येथे प्रचारसभा होणार आहेत.










































































































































