उदयनराजे भोसले – नाना पटोले भेट; नाना म्हणाले, ‘जस्ट वेट अँण्ड वॉच’…

nana-patole-and-bjp-mp-udayanraje-bhonsle- meeting
nana-patole-and-bjp-mp-udayanraje-bhonsle- meeting

नवी दिल्ली: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana-patole आणि राज्यसभेतील भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje-bhonsle यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी नाना पटोले हे दिल्लीत असून, पटोले यांची उदयनराजे भोसले यांनी सोनिया गांधी Sonia-gandhi यांच्या निवासस्थाबाहेर भेट घेतली. भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानं उदयनराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आणि पक्षातील नेते नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नाना पटोले काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते.

दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. 

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं आहे.

तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असं सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मागील आठवड्यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नियुक्ती झाल्यापासून नाना पटोले यांनी भाजपाविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडण्यास सुरूवात केली असून, काँग्रेसला बळकटी देण्यावर अधिक भर राहणार असल्याचं त्यांनी नियुक्तीनंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

हेही वाचा: 

तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांवर पलटवार

म्हणजे विरप्पन गँगचा हानवा लुटीचा मार्ग’, मनसेचा पुन्हा सेनेवर हल्लाबोल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here