भारताचे अनेक देश मित्र होते पण आज भारताचा जगात एकही मित्र नाही: हर्षवर्धन सपकाळ

India had many friendly nations, but today, India does not have a single friend in the world: Harshvardhan Sapkal
India had many friendly nations, but today, India does not have a single friend in the world: Harshvardhan Sapkal

मुंबई:अमेरिकाइस्त्रायलइराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले नाही तर जग आता बहुधृवीय झाले आहे आणि त्याची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. अमेरिकेने महायुद्ध व शीतयुद्ध जिंकले आहे पण जग आता पूर्णपणे बदलले आहेजगाचे नेतृत्व बदलले आहे. रशियाचीन अमेरिकेबरोबर इतर शक्तीही मोठ्या झाल्या आहेत. या बदलत्या जागकित समिकरणात आशिया खंडात पाकिस्तानचे महत्व वाढले आहे पण दुर्दैवाने भारतासाठी ते चांगले नाही. भारताचे परराष्ट्र धोरण जगाची बदलती समिकरणे समजून घेण्यात कमी पडले आहे आणि भारतासाठी हे धोकादायक आहेअसे संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी  Praveen sahni यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित अमेरिका–इराण युद्ध व भारतावर होणारे परिणाम”या विषयावर टिळक भवन येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चर्चासत्राचे अध्यक्ष होते तर माजी खासदार कुमार केतकरहुसेन दलवाईसामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रविण सहानी पुढे म्हणाले कीअमेरिका इराण युद्धात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या मागे रशिया व चीनची शक्ती आहे. या दोन देशांनी इराणला तंत्रज्ञानासह सर्व प्रकारची मदत केली आहे. क्षेपणास्त्र ही इराणची मोठी ताकद आहे तसेच इराणची भौगोलिक स्थिती त्यांची जमेची बाजू आहेहार्मूज सामुद्रधुनी हा यातील एक कळीचा मुद्दा आहे व त्यावर इराणचे नियंत्रण आहे. या हार्मूजमधून जगातील व्यापार मोठ्या प्रमाणात होतोतेल वाहतूक होते तसेच जगातील ३० टक्के इंटरनेचे जाळे याच भागातून जाते. अमेरिकेचे ८० देशात लष्करी तळ आहेतत्याचा १ ट्रिलियीन डॉलर खर्च आहे. कतारदुबईसौदी अरब येथे अमेरिकेची मोठी सैन्यशक्ती व लष्करी तळ आहेतत्याला इराणने लक्ष्य केले आहे. इराण युद्धानंतर अमेरिकेचे आर्थिक व लष्करी साम्राज्य धोक्यात येईलअसेही साहनी म्हणाले.

प्रविण साहनी पुढे म्हणाले कीजग २०१३ नंतर बहुधृवीय झाले आहेत्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेत आले पण जग बदलले आहे हे मानायलाच ते तयार नाहीत. पाकिस्तान जगात महत्वाची शक्ती बनला आहे. ऑपरेशन सिंदूर जिंकले अशा वल्गना आपण करत आहोत पण अमेरिका म्हणते की पाकिस्तानने या युद्धात चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तान हा जगात एकमेव देश आहेज्याचे अमेरिकारशिया व चीन या तीन महाशक्तीबरोबर चांगले संबंध आहेत. पश्चिम आशिया व दक्षिण आशिया या दोन्ही भागात पाकिस्तानला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिका-इराण यांच्यात पाकिस्तानने मध्यस्थी केली त्यावर आपण पाकिस्तान दलाली करत आहेअसे वक्तव्य करतो हे अत्यंत खेदजनक आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणात अनेक त्रुटी आहेतआपण वस्तुस्थिती मानायलाच तयार नाही. जगाचे नवे समिकरण भारत अजून स्विकारायला तयार नाही. भारत मोठा देश आहेदक्षिण आशियात मोठी शक्ती बनली पाहिजे. रशियाची मैत्री भारतासाठी महत्वाची आहे पण आपण अमेरिकेकडे झुकलो आहोतअमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानाचा जाहीर अपमान करतो आणि आपण गप्प बसतो. भारताला संधी आहे ती वेळीच ओळखून परराष्ट्र धोरण बदलले नाही तर ते भारतासाठी धोक्याचे ठरेल. इरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हे अमेरिका इस्त्राईलच्या हल्ल्यात मारले गेले पण त्यावर भारताकडून साधा खेदही व्यक्त केला गेला नाही व शोकसंदेशही नाही. आज इराण भारताबरोबर चांगले संबंध ठेवून आहे तो फक्त भारत व इराण या दोन देशातील जुने संबंध आहेत म्हणूनआजच्या मोदी सरकारमुळे नाही. दोन्ही देशातील संस्कृतीपरंपरा व संबंधामुळे इराण आजही भारताशी चांगले संबंध ठेवून आहेअसेही सहानी यांनी सांगितले.

चर्चासत्राचा समारोप करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीहा काही राजकीय कार्यक्रम नाही पण टिळक भवन मध्ये नवनवीन विषयावरील चर्चासत्र आयोजित केली जात आहेत हे महत्वाचे आहे. आतापर्यंतच्या लढाईचे तंत्र व आजचे तंत्र यात मोठा बदल झालेला आहे. आता युद्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लढले जात आहेते अमेरिका-इराण युद्धातून स्पष्ट झालेले आहेच. युद्ध हवे की बुद्धअसा प्रश्न येतो तेव्हा बुद्ध हवा हीच आपली भूमिका राहिलेली आहे. २०१४ नंतर सर्व संदर्भही झपाट्याने बदलले आहेत. भारताचे नेपाळरशियाश्रीलंका या सह अनेक देशांशी मित्रत्वाचे संबंध होते पण आज आपल्याला एकही मित्रदेश राहिलेला नाही. जगातील आजची परिस्थिती बदललेली आहेथिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली हे सुत्र आज सर्वात महत्वाचे आहे पण आपण जातपंथधर्म यातच अडकून पडलेलो आहोत. देशात जिओ पॉलिटिक्स सुरु असून ते हम दोहमारे दो एवढ्यापुरतेच आहेआपल्याला विश्वबंधुत्वाचा वारसा लाभलेला आहेत्यासाठी आता आपल्याला स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहेअसे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here