अंगणवाडी सेविकांना दिवाळी भाऊबीजेची ‘दोन हजार रुपये’ भेट; यशोमती ठाकूर यांची घोषणा

महाविकास आघाडी सरकारची दिवाळी भेट

Aanganwadi sevika in Maharashtra to get rs 2000 bhaubeej gift
Aanganwadi sevika in Maharashtra to get rs 2000 bhaubeej gift

मुंबई l एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका  कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. अशी घोषणा महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी केली आहे.

कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी सांगितले.

हेही वाचा l lava flip feature phone l स्वस्त ‘लावा फ्लिप’ फीचर फोन लाँच

राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर Yashomati Thakur म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.

हेही वाचा l भाजपने बिहारमध्ये जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसींचा’ पहिला क्रमांक

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री अॅड. ठाकूर म्हणाल्या

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here