मुंबई l सर्व महिलांना बुधवारपासून लोकल ट्रेनमध्ये प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन केली आहे. सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. शुक्रवारी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचं म्हटलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती.
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020
मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असं वाटत असतानाच तो जैसे थेच राहिला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र आज पाठवलं. त्याची मात्र दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली दिसत असून महिलांना राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे.
वाचा l फडणवीस जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर म्हणाले….
[…] […]