ST BUS : महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी धावणार

सोमवारपासून पनवेल, डोंबिवली, विरार ते मंत्रालयापर्यंत बससेवा

st-for-female-employees-special-from-Monday
महिलांसाठी विशेष बस धावणार st-for-female-employees-special-from-Monday

मुंबई : महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या मागणीनंतर अवघ्या तीन दिवसात (18 सप्टेंबर) अनिल परब यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (२१ सप्टेंबर) गर्दीच्या वेळेत विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष बससेवा सुरु केली जाणार आहे. महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार पनवेल-मंत्रालय, डोंबिवली-मंत्रालय आणि विरार-मंत्रालय या मार्गावर महिला विशेष बस चालवल्या जाणार आहे. येत्या सोमवारी 21 सप्टेंबरपासून या बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

दरम्यान संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास-दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरामध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय आणि खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.

पनवेल, डोंबिवली, विरार येथून मंत्रालयापर्यंत या एसटी बस सोडण्यात येतील. प्रत्येक ठिकाणाहून सकाळी एक एसटी बस सुटेल. मंत्रालय येथून सायंकाळी याच मार्गावर एसटी बस सोडण्यात येतील. प्रायोगिक तत्वावर या बस चालवण्यात येतील. त्यानंतर हळूहळू त्यांच्या वाढवण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

एसटी बससेवा

मार्ग     सुटण्याची वेळ

पनवेल ते मंत्रालय   स. ८.१५ वा.

डोंबिवली ते मंत्रालय  स.८.१५  वा.

विरार ते मंत्रालय स. ७.४५ वा.

(मंत्रालय येथून डोंबिवली आणि विरारसाठी सायंकाळी ५.३५ वाजता आणि पनवेलसाठी ५.४५ वाजता प्रत्येकी एक फेरी होईल.)

सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर आणखी १५० फेऱ्या

पश्चिम रेल्वेवर २१ सप्टेंबरपासून आणखी १५० लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसाला होणाऱ्या ३५० लोकल फे ऱ्यांची संख्या ५०० पर्यंत पोहोचणार आहे. अत्यावश्य सेवेतील कर्मचारी प्रवासीसंख्या २ लाख २५ ते २ लाख ३१ हजारापर्यंत पोहोचली आहे. लोकल फे ऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेने आणखी १५० फे ऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव लोकल फेऱ्यांमध्ये ३० फे ऱ्या सकाळी आणि २९ फे ऱ्या सायंकाळी धावतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here