Assembly Elections 2021: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; वाचा एका क्लिकवर

assembly-elections-2021-in-five-states-ec-announces-poll-schedule-for-west-bengal-kerala-tamil-nadu-assam-puducherry
assembly-elections-2021-in-five-states-ec-announces-poll-schedule-for-west-bengal-kerala-tamil-nadu-assam-puducherry

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आल्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशाची विधानसभा निवडणूक होणार आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या ८२४ जागांवर २७ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत मतदान होणार आहे. निकाल २ मे रोजी जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषेदत ही माहिती दिली.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक २९४, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुदुचेरीत ३० विधानसभा जागांसाठी मतदान होईल. नोव्हेंबर २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता करोनाकाळात या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम ( एकूण २९४ जागा)
पश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदान होणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.

आसाम निवडणूक कार्यक्रम
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल.
पहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर एक एप्रिल आणि सहा एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल.

पुदुचेरी निवडणूक कार्यक्रम (३० जागा)
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

तामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम (२३४ जागा)
तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

केरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा)
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे
>>दारोदार प्रचाराची उमेदवारासह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.
>>संशयित कोविड रुग्णासाठी स्वतंत्र नियम असतील.
>>निवडणूक अधिकार्‍यांचे लसीकरण झालेले असेल.

वाचा: Yusuf pathan announces retirement: युसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here