कंगनाविरोधात गुन्हा दाखल करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश

कंगनाच्या अडचणीत वाढ; वांद्रे पोलीस चौकशीसाठी बोलवणार

bandra-court-orders-to-register-fir-agaisnt-kangana-ranaut-
bandra-court-orders-to-register-fir-agaisnt-kangana-ranaut-

मुंबई l बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत kangana-ranaut आणि तिची बहिण रंगोलीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला आहे. या प्रकरणामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.

हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे.

कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर

कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

वांद्रे पोलीस तक्रार घेतली नव्हती त्यानंतर ठोठावला होता न्यायलाचा दरवाजा

याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.

वाचा l आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांचे पुत्र तेजस ठाकरेंचं कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here