औरंगाबाद:देशात मागील काही वर्षांत धर्मा धर्मात फूट पाडून देश तोडण्याचे काम धर्मांध शक्ती प्रयत्न करत आहेत. हा देश हिंदू मुस्लीम शिख ईसाई सर्व धर्मियांचा आहे. ज्या विभाजनवादी शक्ति द्वेषाचे विष पेरून देशात फूट पाडू पहात आहेत त्यात ते सफल होणार नाहीत, असे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी म्हटले आहे.
शहरात काँग्रेस कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती, यावेळी सर्व धर्माचे धर्मगुरू काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, प्रकाश मुगदीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, डॉ.पवन डोंगरे, नंदकीशोर नजन, अल्पसंख्याक सेलचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, माजी शहराध्यक्ष इब्राहीम पठाण, एड.सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, इकबालसिंग गिल, किरण पाटील, निमेश पटेल, मुस्लीम एत्तेहाद फ्रंटचे जावेद कुरेशी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेख अथहर, इद्रीस नवाब, मोईन हरसूलकर, डॉ. मुर्तुजा, एम.ए.अझहर, डॉ. अरुण शिरसाठ, माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे, माजी नगरसेवक मोहसीन पहेलवान, अज्जु जैदी, अज्जू पहेलवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रीस नवाब, जावेद खान, मुद्दस्सीर अन्सारी, डॉ. शोएब हाशमी, डॉ. सरताज पठाण, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार, संपादक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हिशाम उस्मानी म्हणाले की, आज देशात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात असताना आजची ही इफ्तार पार्टी सर्वधर्मसमभावचा संदेश देणारी आहे. धर्मा धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करणा-यांना आजची इफ्तार पार्टी ख-या भारताचे प्रतिनिधित्व करणारी आहे. देश सर्वांच्या संघर्षाने व अनेक स्वातंत्र्यसोनिकांच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला. देशात सर्व धर्माचे लोक रहात आहेत पण त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काही पक्ष व संघटना करत आहेत त्यांना लोक धडा शिकवतील असे सांगून काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.