औरंगाबाद शहरातील पोलीस वसाहतींचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार;गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही!

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

Aurangabad city police will solve the issue of settlements on priority basis
Aurangabad city police will solve the issue of settlements on priority basis

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील क्रांती चौक, टी.व्ही.सेंटर येथील पोलीस वसाहतींचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावला जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडवणीस यांनी आज (दि.29) विधान परिषदेत दिली. आ.सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील पोलीस वसाहतींच्या झालेल्या दुरावस्थेसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

क्रांती चौक पोलीस वसाहतीचे काम सन 1963 तर टी.व्ही.सेंटर येथील पोलीस वसाहतीचे काम सन 1980 मध्ये झाले. मात्र 30 ते 35 वर्षातच या दोन्ही वसाहती मोडकळीस आल्या असून या वसाहतींची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. सन 2018 मध्ये या इमारतीच्या दुरूस्तीसाठी 7 कोटी रूपये खर्च करूनही त्या दुरावस्थेतच आहे.

सदरील इमारतीचे प्लास्टर निघाले आहेत, ड्रेनेज लाईन व सार्वजनिक शौचालये खराब झाली असून पोलीस कर्मचार्‍यांना दुर्दशा झालेल्या परिस्थितीत राहावे लागत असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत याठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी सभागृहात केली.

राज्यातील 306 पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्पाच्या बांधकामास प्राधान्यक्रम ठरविण्याची कार्यवाही पोलीस महासंचालक कार्यालयाच्या स्तरावर सुरू असून यामध्ये औरंगाबाद शहरातील पोलीस वसाहतींना प्राधान्य देण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. याचर्चेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे, आ.विकम काळे यांनी देखील सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here