MAHA TET RESULT : ३ लाख ६० हजार भावी शिक्षकांचे आयुष्य अंधारात!

टीईटी निकालाची नऊ महिन्यांपासून प्रतिक्षा, वयोमर्यादा पार होण्याची भीती

bench-order-to-pay-monthly-salary-to-teachers-accused-of-tet-scam-news-update-today
bench-order-to-pay-monthly-salary-to-teachers-accused-of-tet-scam-news-update-today

मुंबई: विद्यार्थ्यांचे उज्जवल भविष्य घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) ११ नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. राज्यात ३ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परंतु आता भावी शिक्षकांचे आयुष्यच अंधारात सापडले असून गेल्या नऊ महिन्यांपासून ते शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. निकालास उशीर होत असल्याने अनेक उमेदवारांना वयोमर्यादा ओलांडण्याची भीती सतावत आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) ११ नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. राज्यात ३ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेला नऊ महिने उलटले तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने निकाल जाहीर करण्यात आले नाही. नोकरीसाठी वयोमर्यादा संपली तर आमचे आयुष्य वाया जाईल अशी भिती भावी शिक्षकांना वाटत आहे. त्यामुळे भावी गुरुजींच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर, ‘टीईटी’ दोन वर्षांपासून रखडली होती. डीएड, बीएड पात्रताधारक दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेली परीक्षा २१ नोव्हेंबर २०२१ ला घेण्यात आली. शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडल्याने टीईटी परीक्षेला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. त्यात दोन वर्षे परीक्षा झाली नसल्याने, यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली होती.

‘प्राथमिक स्तरावरील पेपर-१’ व ‘माध्यमिक स्तरावरील पेपर-२’साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ६० आहे. यापैकी औरंगाबाद केंद्राहून १९ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परंतु निकालाला विलंब लागत असल्यामुळे भावी गुरुजींची चिंता वाढली आहे.

विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही…

२०२१ च्या शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) चे निकाल लागले नाही. अधिवेशनात मी निश्चितपणे हा मुद्दा मांडणार आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळून देऊ. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना न्याय मिळून देण्यासाठी हा मुद्दा निश्चितपणे मांडू.

आ. अंबादास दानवे (विरोधी पक्ष नेते, विधान परिषद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here