VIDEO l चक्क ५ वर्षांची चिमुरडी वाजवतेय ड्रम

अमेरिकेचा बॉस्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅनने Rex Chapman ट्विटरवर शेअर केला video

drum-video-small-child-playing-viral-on-social-media
drum-video-small-child-playing-viral-on-social-media

सोशल मीडियावर social media अनेक व्हिडिओ व्हायरल viral video  होत असतात. सध्याच एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे. एक ५ वर्षाची चिमुरडी एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे ड्रम वाजवत आहे. हा व्हिडिओ पूर्व अमेरिकेचा बॉस्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅनने Rex Chapman ट्विटरवर शेअर केला होता.

हा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला. एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी ड्रम सेटच्या समोर बसली आहे. एका बॅकग्राऊंडमध्ये वाजणाऱ्या गाण्याच्या धूनवर ती ड्रम वाजवण्यासाठी तयार आहे. जसेच संगीत सुरू होते तसे ती ड्रम वाजवण्यास सुरूवात करते. तसेच गाण्यामध्ये जिथे जिथे पॉझ आहे तेथे तीही पॉज घेते.

हेही वाचा l Bihar Munger l“बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो”

ड्रम वाजवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद देखण्यासारखा आहे. मुलीचा हा क्यूट अंदाज सोशल मीडियावरील लोकांना खूप आवडला आहे. ट्विटरवर याला ५.४ लाख व्ह्यूज मिळाले आहे तर १७,२००हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंटरनेट युजर्स मुलीचे हे कौशल्य पाहून हैराणच झाले.

हेही वाचा l farm laws l केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात शनिवारी काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह

एका युजरने लिहिले की मी नेहमीच म्हणत आलोय की मुलांना खेळणी नव्हे तर योग्य वाद्य दिले पाहिजे. हा काही चमत्कार नाही. मुलांना जेव्हा योग्य उपकरणे त्यांच्या हातात भेटतात तेव्हा ते या गोष्टींकडे वळतात.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here