औरंगाबादसह ९ महापालिकांमधील आरक्षण सोडत रद्द

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १४ महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.

Cancellation of reservation in 9 municipalities including Aurangabad news update today
Cancellation of reservation in 9 municipalities including Aurangabad news update today

मुंबई : राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी होणारी औरंगाबादसह नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा भाईंदर या ९ महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. ती आता काढण्यात येणार नाही

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १४ महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here