Cantonment Board l देशातील 56 छावणी परिषदांच्या स्वीकृत सदस्यांना मुदतवाढ!

सहा महिने निवडणुका लांबण्याची शक्यता, इच्छुकांचा हिरमोड

57-elections-boards-cancelled-across-country-including-aurangabad-cantonment-board-politics-news-update-today
Extension of 56 nominate members cantonment borard in the country

मुंबई l देशातील 62 छावणी परिषदांमध्ये (Cantonment Board) दोन वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत. संरक्षण मंत्रालयाने प्रत्येक छावणी परिषदेमध्ये एक स्वीकृत सदस्य नियुक्त केला आहे. त्यांची मुदत 10 ऑगस्ट रोजी संपणार होती. रात्री उशीरा संरक्षण मंत्रालयाने आदेश काढून त्यामध्ये सहा महिने वाढ केली. त्यामुळे निवडणूका सही महिने लांबण्याची चिन्हे आहेत.

देशभरात एकूण 62 छावणी परिषदा आहेत. त्यापैकी सहा छावणी परिषदांमध्ये स्वीकृत सदस्यांना आधीच मुदतवाढ दिली. आता 56 परिषदांमध्ये मुदतवाढ देण्याचे आदेश शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने काढले. ते आदेश रात्री उशीरा छावणी परिषदांणा प्राप्त झाले. छावणी परिषदांमध्ये गेल्या दोन वर्षापासून निवडणुका झाल्या नाही.

केंद्रीय पातळीवर निवडणुकीबाबत हालचाली सुरु आहेत. संरक्षण मंत्रालयाने सर्व छावणी परिषदांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त केले होते. त्या स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे तसेच निवडणुकीबाबत तारीख निश्चित नसल्यामुळे स्वीकृत सदस्यांना मुदतवाढ दिली.

जानेवारीमध्ये देशातील छावणी परिषदांचे पथकर नाके केंद्राने बंद केले होते. महाराष्ट्रातील सातपैकी तीन पथकर नाक्यांचा त्यामध्ये समावेश होता. आता चार पथकर नाके बंद करण्याच्या हालचाली सुरु आहे. हे सर्व सुरु असताना छावणी परिषदांचा महापालिकांमध्ये समावेश होणार अशाही हालचाली सुरु होत्या. परंतु ते सध्या तरी शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिका-यांचे म्हणणे आहे. छावणी परिषदांचे अभ्यासक मयांक पांडे यांनी निवडणूका लांबणार असल्याचे सांगितले.

छावणी परिषदांमध्ये पुढील वर्षी निवडणुका होण्याची शक्यता…

छावणी परिषदांमध्ये पुढील वर्षी निवडणुका होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच जनतेतून थेट उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहे. आता स्वीकृत सदस्यांना मुदतवाढ देण्याची निर्णय शुक्रवारी उशीरा संरक्षण मंत्रालयाने घेतल्यामुळे छावणीमध्ये निवडणूक लढणा-या इच्छूकांचा हिरमोड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here