…मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा;शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

Shivsena-mp-sanjay-raut-taunt-bjp-amravati-nagpur-aurangabad-nashik-and-konkan-mlc-election-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-taunt-bjp-amravati-nagpur-aurangabad-nashik-and-konkan-mlc-election-news-update-today

मुंबई l लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांनी तेथे बांधकाम करून रेड आर्मीचे लाल निशाण फडकवले आहे. ते लाल निशाण आधी उतरवून दाखवा व मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा.’ देवेंद्र फडणवीसांनी Devendra fadnavis मुंबई महापालिकेवरील  BMC सत्तेवर भाष्य केले होते. त्यावर त्यांना सामनामधून Saamana सुनावण्यात आले आहे.

भारत-चीन सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. अशीच परिस्थिती पाकिस्तानच्या सीमेवर प्रामुख्याने काश्मीरमध्ये आहे. यावेळी ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला आहे. यासोबतच शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवरही निशाणा साधला आहे.

भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते.

त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते. देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? अशी टीका शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केली आहे. सामना अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार

पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, ‘मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे. लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य बसले आहे.

त्यांनी तेथे बांधकाम करून रेड आर्मीचे लाल निशाण फडकवले आहे. ते लाल निशाण आधी उतरवून दाखवा व मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा.’ देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेवरील सत्तेवर भाष्य केले होते. त्यावर त्यांना सामनामधून सुनावण्यात आले आहे.

चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही

पुढे अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. कश्मीर खोऱ्यात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे. कश्मिरातील विषय गंभीर खरेच, पण चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही.

हेही वाचा l Schools Reopening l शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, जिल्हा प्रशासनाला दिली जबाबदारी

ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे. वाटल्यास श्रीनगर, पाकव्याप्त कश्मीर वगैरेंवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची नियुक्ती करावी, पण चिनी सैन्य चारही बाजूंनी धडका देत आहे त्यांना कधी रोखणार?

चीनचे काय करणार? डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय?