मुंबई l भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
एकनाख खडसे यांनी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले होते. महत्त्वाचं म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.




















































































































































































[…] […]