भाजपाचे १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांची माहिती

एकनाथ खडसेंच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल

many-bjp-mlas-on-the-path-of-ncp-says-jayant-patil
many-bjp-mlas-on-the-path-of-ncp-says-jayant-patil

मुंबई l भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी (23 ऑक्टोबर) ला प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्याबरोबर भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले, “खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील. तसेच कोरोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळे १० ते १२ आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. “गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. 

वाचा l एकनाथ खडसेंची भाजपाला सोडचिठ्ठी, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश; जयंत पाटील यांची घोषणा

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचं स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल

भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल

एकनाथ खडसेंसोबत येण्याची अनेक जणांची इच्छा, मात्र कोरोना काळात विधानसभा निवडणूक घेणे शक्य नाही, त्यामुळे हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील, अनेक जण त्यांच्या संपर्कात

एकनाथ खडसेंना आम्ही प्रवेश दिला आहे, भाजपकडून हिरमोड झालेले आणि भाजपकडून विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील

वाचा l Brinjal Benefits l वांगी खाण्याचे ७ फायदे जाणून घ्या

विविध भागातील तीन ते चार भाजप नेत्यांशी चर्चा, त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा, एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, दिवसाढवळ्याच होईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here