facebook Dark Mode l फेसबुकचा ‘डार्क मोड’ लाँच

facebook-rolls-out-dark-mode-on-android-for-users-worldwide
facebook-rolls-out-dark-mode-on-android-for-users-worldwide

नवी दिल्ली l लागोपाठ व्हिडीओ बघताना अनेकदा बॅटरी वेगाने संपते. अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्यांसाठी फेसबुकने डार्क मोड facebook Dark Mode  लाँच केला. जगभरातील सर्व अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्यांना फेसबुकचा डार्क मोड उपलब्ध होणार आहे. Facebook rolls out Dark Mode on Android for users worldwide

 बॅटरी वाचवणारा फेसबुकचा डार्क मोड facebook Dark Mode

लागोपाठ व्हिडीओ बघताना अनेकदा बॅटरी वेगाने संपते. जर बॅटरी चार्ज करण्यासाठी आसपास सोय नसेल तर वापरकर्ते ब्राइटनेस कमी करुन बॅटरी वाचवण्याचा प्रयत्न करत फेसबुक बघतात. ही बाब लक्षात आल्यामुळे फेसबुकने डार्क मोड लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

डार्क मोड अॅक्टिव्ह करुन फेसबुक बघितल्यास नॉर्मल मोडच्या तुलनेत बॅटरी कमी खर्च होते आणि दीर्घकाळ मोबाइल चार्ज न करता वापरणे शक्य होते. 

फेसबुक वापरताना पोस्ट वाचण्याऐवजी फोटो बघणे आणि व्हिडीओ बघणे याला वापरकर्त्यांकडून जास्त पसंती दिली जाते. व्हिडीओ बघताना एका मागून एक व्हिडीओ बघत राहण्याकडे वापरकर्त्यांचा कल जास्त आढळतो.

 डार्क मोड अॅक्टिव्ह – इनअॅक्टिव्ह करता येणार

बॅटरी वाचवणाऱ्या डार्क मोडला फेसबुक वापरकर्ते त्यांच्या मर्जीने अॅक्टिव्ह (सुरू करणे) आणि इनअॅक्टिव्ह (बंद करणे) करू शकतात. वापरकर्त्यांसाठी हा पर्याय सोयीचा आहे. 

फेसबुक, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसाठी डार्क मोड

फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसाठी आधीपासूनच डार्क मोड उपलब्ध आहे. आता फेसबुकसाठीही डार्क मोड उपलब्ध होत आहे.

हेही वाचा l Money Heist 5 l त्या चोरीचा शेवट करायला येतोय…

फेसबुकच्या डार्क मोडमुळे स्क्रीन पूर्ण काळी होणार नाही. सर्व लोगो आणि आयकॉन वेगळ्या रंगछटांमध्ये स्पष्ट दिसतील. डार्क मोड या प्रकारात बॅटरीचा मर्यादीत वापर करुन स्क्रीन व्यवस्थित दिसेल अशी खबरदारी घेण्यात आली आहे. 

अँड्रॉइड मोबाइलसाठी फेसबुकचा डार्क मोड

फेसबुक, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या सर्व अॅपसाठी डार्क मोड उपलब्ध आहे. जगातील अनेक अॅपच्या तुलनेत फेसबुक समुहाच्या सर्व सोशल मीडिया अॅपचे डार्क मोड उशिरा लाँच झाले आहेत.

याच वर्षी मे महिन्यात फेसबुकच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी डार्क मोड लाँच झाला. यानंतर जवळपास पाच महिन्यांच्या अंतराने अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्यांसाठी फेसबुकने डार्क मोड लाँच केला. 

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here