चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणाले…

On Chandrakant Patil's statement, Eknath Khadse said ...
On Chandrakant Patil's statement, Eknath Khadse said ...

भाजपावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे  Eknath khadse भाजपाला रामराम ठोकणार आहेत. अशी जोरदार चर्चा सुरु आहे. चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यासमोर जाऊ नका, असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील खडसेंना उद्देशून म्हणाले होते. त्याबाबत खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला आहे.

एकनाथ खडसे यांना पक्षांतराबाबत माध्यमांनी विचारले असता त्यांनी सूचक मौन धारण केलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नसल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलं आहे. तत्पूर्वी चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यासमोर जाऊ नका, असं भाजपा नेते चंद्रकांतदादा पाटील खडसेंना उद्देशून म्हणाले होते.

वाचा : Corona updates l आपल्याला आता कोरोनासोबतच जगावं लागणार; आरोग्यमंत्री

माणसाला भावभावना असतात. भावभावना तो व्यक्त करतो. नाथाभाऊंना एवढंच म्हणणं आहे की, तुम्ही आमचे पालक आहात. बंद खोलीमध्ये दोन थोबाडीत मारा चालेल ना, सारखं तुम्हाला दांडके कशाला लागतात, असा सवालही चंद्रकांतदादा पाटलांनी उपस्थित केला होता.

गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे शरद पवारांना भेटून राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून, खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या कार्यकारिणीत खडसेंना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचा कयासही वर्तवण्यात येत होता.

वाचा : TRP SCAM l भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचा एक भाग,काँग्रेस नेत्याचा आरोप

गेल्या आठवड्यात शरद पवार आणि पक्षातील जळगावमधील नेत्यांसोबत एक बैठक केली होती. या बैठकीत खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचं बोललं जात होत. त्यानंतर आता  एकनाथ खडसे मुंबईत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. परंतु एकनाथ खडसे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.