Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

found-blockage-in-mla-sanjay-shirsats-heart-lilavati-hospital-gave-latest-health-news-update
found-blockage-in-mla-sanjay-shirsats-heart-lilavati-hospital-gave-latest-health-news-update

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi ShivSena) पक्षाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळली आहे, याबाबतची माहिती लिलावती रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जलील पारकर (Dr. jalil parkar) यांनी दिली.

संजय शिरसाटांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देताना डॉ. जलील म्हणाले, शिरसाटांना रुग्णालयात दाखल केलं असता, सर्वप्रथम त्यांना स्थिर करण्यात आलं. त्यांच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण केल्या आणि अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओग्राफी करत असताना त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी (ब्लॉकेज) आढळली आहे. डॉ. नितीन गोखले यांनी अँजिओप्लास्टी केली आहे.

पुढील किमान पाच दिवस शिरसाट यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल. अँजिओप्लास्टी केल्यानंतर पुढील काही तास प्रकृतीला धोका असतो, त्यामुळे शिरसाट यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवून आहेत. पुढील किमान दोन दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येईल, त्यानंतर पुढील तपासणी करून त्यांना आयसीयूतून शिफ्ट केलं जाईल, अशी माहिती डॉक्टर चिन्मय गोडबोले यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here