Aaditya Thackeray l आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

aaditya-thackeray-attacks-eknath-shinde-over-twitter-poll –news-update-today
aaditya-thackeray-attacks-eknath-shinde-over-twitter-poll –news-update-today

मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.  असं त्यांनी आवाहन केलं आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे १५ ते  १७ मार्च  असे सलग तीन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामी होते.

हेही वाचा:  मोठी बातमी: अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाकरे यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता. या दौऱ्यात त्यांनी व्याघ्र सफारीचा आनंद लुटल्याची माहिती समोर आलेली आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तीन दिवस होते ताडोबात मुक्कामी!

या दौऱ्यात ताडोबात त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही. एका रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता. रिसोर्ट कंपनीनेही या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सर्वांना माहिती झाली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here