मोठी बातमी: अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट!

परमबीर सिंगांचा खळबळजनक आरोप 

ed-has-attached-immovable-assets-worth-4-20-crore-belonging-to-anil-deshmukh-and-his-family-under-pmla-in-a-corruption-case-news-update
ed-has-attached-immovable-assets-worth-4-20-crore-belonging-to-anil-deshmukh-and-his-family-under-pmla-in-a-corruption-case-news-update

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग Prambir Singh यांनी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. असा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत.

वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली होती.

डीजी रँकमध्ये हे शेवटच्या दर्जाचं पद असल्याने एक प्रकारची शिक्षा केल्या सारखीच राज्यसरकारने सिंह यांना वागणूक दिली होती.

त्यामुळे सिंह नाराज होते. अपराध केल्यासारखी ही वागणूक असल्यामुळे सिंह नाराज असल्यानेच त्यांनी देशमुख-वाझे नेक्ससचा पर्दाफाश केला असावा असं बोललं जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here