Shiv sena Dussehra Rally Live : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा – उद्धव ठाकरे

Otherwise call for Maharashtra bandh, Uddhav Thackeray angry with Governor; said...
Otherwise call for Maharashtra bandh, Uddhav Thackeray angry with Governor; said...

Shiv Sena Dussehra melava: शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dussehra Rally) हे एक वेगळंच नातं आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) म्हणजे शिवतीर्थावर (Shivtirth) दरवर्षी होणारा दसरा मेळावा यंदा प्रथमच सभागृहात होणार आहे.

शिवाजी पार्क जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात यंदाचा दसरा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय भाष्य करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि नियमांमुळे सभागृहात केवळ ५० जणांनाच प्रवेश असणार आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा प्रथमच ऑनलाईन होणार आहे. तुम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा फेसबूक, ट्वीटर, युट्यूबवर लाईव्ह पाहू शकतात.

शिवसेना मेळाव्याला प्रमुख उपस्थिती

शिवसेना सचिव – अनिल देसाई, विनायक राउत, आदेश बांधेकर, मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण

युवासेना मुंबईचे पदाधिकारी – अमोल किर्तीकर आणि वरुण सरदेसाई

लोकसभा खासदार – अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे

राज्यसभा खासदार – प्रियंका चतुर्वेगी

विधानसभेचे आमदार – प्रकाश सुर्वे, सुनिल राऊत, रमेश कोरगांवकर, रविद्रं वायकर, सुनिल प्रभु, रमेश लटके, दिलीप लांडे, प्रकाश फातर्फेकर, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, सदा सरवणकर, अजय चौधरी, यामिनी जाधव

विधानपरिषद आमदार – अनिल परब, विलास पोतनीस, मनिषा कायंदे, मंत्री नीलम गोर्हे

मुंबईच्या महापौर – किशोरी पेडणेकर

जनसंपर्कप्रमुख – हर्षल प्रधान

शिवसेना दसरा मेळाव्याचे अपडेट्स (Shiv Sena Dussehra Rally Live updates)

  1. वाघाची अवलाद आहे डिवचाल तर पस्तवाल
  2. वाटेला जार तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू
  3. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा
  4. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
  5. पुढच्या २५ वर्षांचा करार करुन पुन्हा सत्तेत येऊ
  6. पैशाचा खेळ कितीही करा सरकारला धक्का लागणार नाही
  7. कोणी कितीही कारस्थाने केली तरी ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार
  8. हा आत्मविश्वास बाळासाहेबांमुळेच
  9. चिखलफेक झाली, आरोप झाले पण मुख्यमंत्री स्थितप्रज्ञ राहिले
  10. राज्यावरील प्रत्येक संकटाशी लढताना कुठेही डगमगलेनाही
  11. सावरकर आणि शिवसेनेचे एक घट्ट नाते आहे
  12. ही भूमिका आम्ही सावरकरांकडून शिकलो आहोत
  13. हिंदुत्वाचे धडे आम्हाला देण्याची गरज नाही
  14. आगामी काळात महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखणार
  15. महाराष्ट्राची ११ कोटी जनता ही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतच
  16. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे माझं भाकित खरं ठरलं
  17. गेल्यावर्षी याच दिवशी विजयाचा प्रारंभ झाला
  18. आता यापुढे सगळं ‘महा’ होणार- संजय राऊत
  19. हा महाविजयादशमी सोहळा- संजय राऊत
  20. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भाषणाला सुरुवात
  21. व्यासपीठावर सुभाष देसाई, संजय राऊत, अनिल देसाई, एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे उपस्थित
  22. शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने दसऱ्या मेळाव्याला सुरुवात
  23. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्वागत
  24. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात दाखल
  25. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here