मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच असून एकाच दिवसात १४ हजार १६१ नवे कोरोना रुग्ण आढळले. कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या बघता सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान, २४ तासात ३३९ मृत्यूंची नोंद झाली आहे. (Maharashtra today 14161new covid19 cases)
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४ लाख ७० हजार ८७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील २४ तासात ११ हजार ७४९ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत करोनामुळे २१ हजार ६९८ रुग्णांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.
सध्या राज्यात शाळा, जिम, चित्रपटगृह बंद आहेत. गुरुवारपासून एसटी महामंडळाने बस सेवा सुरु केली आहे. मुंबईतील लाइफलाईन समजली जाणारी लोक रेल्वेसेवा सध्या बंद आहेत तरी सुध्दा रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. राज्यात रुग्ण संख्या कोरोनामुक्त होण्याचा प्रमाण ७१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे हे सध्यातरी दिलासादायक आहे.



















































































































































































