महेबूब शेख यांना कुणी तरी बदनाम करत आहे : गृहमंत्री अनिल देशमुख

Someone is defaming Mahboob Sheikh: Home Minister Anil Deshmukh
Someone is defaming Mahboob Sheikh: Home Minister Anil Deshmukh

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Ncp youth congress president महेबूब शेख Mehboob shaikh यांना महिलेवरील अत्याचार प्रकरणी अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख Anil deshmukh म्हणाले की, या प्रकरणी तेथील पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी केली. मागील एक वर्षात कोणत्याही प्रकाराचा संवाद झाला नाही. अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. यामध्ये काही तरी राजकारण आहे, असंही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. मात्र कालच औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि शेख मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता मेहबूब शेख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे सर्व नेते मैदानात उतरले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार युवा नेते रोहित पवार यांनी प्रथमच याप्रकरणी सविस्तर भूमिका मांडली आहे. मागील 1 वर्षात महेबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही याप्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या भाजपवर जोरदार शरसंधान साधलं आहे. एखाद्याचे चारित्र्यहनन करून आसुरी आनंद लुटणाऱ्यानो हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे?, असा सवाल करत भाजपवर जोरदार टीका केलीय.

तुमच्या अनेक आमदार खासदारांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. जेव्हा काढू तेव्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा देत हिरव्या देठाची भाषा महाराष्ट्र विसरला नसल्याचं मिटकरी म्हणाले.

पोलिसांचं म्हणणं काय…?

मागील 1 वर्षात महेबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आलीय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केलाय.

औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख यांनी भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महेबूब शेख यांचा खुलासा

औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि महेबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेबूब शेख म्हणाले.

संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतोय, असं महेबूब शेख म्हणाले होते.

14 नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असंही महेबूब शेख म्हणाले. महेबूब शेख यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यह भी पढ़े : यह भी पढ़ें : Aadhar Card Enrollment Center: घर बैठे आधार सेंटर का पता ऐसे निकाल सकते हैं, देखीए पूरी लिस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here