कंगनाचा शरद पवारांवर आरोप; आव्हाडांनी मानसिक रोगी म्हणून…

big-relief-to-mla-ncp-jitendra-awhad-in-molestation-case-pre-arrest-bail-granted
big-relief-to-mla-ncp-jitendra-awhad-in-molestation-case-pre-arrest-bail-granted

मुंबई : अभिनेत्री कंगना रणैतच्या कार्यालयावर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. महापालिकेतर्फे २०१८ मध्ये कंगनाला बजावण्यात आलेली एक नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली. या नोटीसला बिल्डरनं सामोरे जाण्याची आवश्यकता असून ती बिल्डींग शरद पवार यांच्या संबंधित आहे. आम्ही त्यांच्या पार्टनरकडून हे घर विकत घेतलं होतं. असं कंगनानं म्हटलं होतं.

याबाबत राष्ट्रवादी नेते ना. जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले. आव्हाड यांनी ट्विट करून कंगनाचं नाव नं घेता मानसिक रोगी असा हॅशटॅगशीही शेअर केला आहे. त्यामुळे आता कंगना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पेटण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

शरद पवार यांच्या पार्टनरकडून घर घेतलं

कंगनाच्या खार येथील घरी मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली होती. ज्या ठिकाणी पालिकेतर्फे बुधवारी कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नव्हती. ही नोटीस केवळ आपल्यासाठी नसून संपूर्ण इमारतीसाठी होती. या नोटीसला बिल्डरनं सामोरे जाण्याची आवश्यकता असून ती बिल्डींग शरद पवार यांच्या संबंधित आहे. आम्ही त्यांच्या पार्टनरकडून हे घर विकत घेतलं होतं. असं कंगनानं म्हटलं होतं. तसंच कंगनानं एक नोटीसही शेअर केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र उभा केला आणि बांधला

“शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र उभा केला आणि बांधला हे महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबद्दल काहीच माहित नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली,” असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. तसंच यासोबत त्यांनी मानसिक रोगी असा हॅशटॅगशीही शेअर केला आहे.

कंगना रणावत ने सोनिया गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली  आहे. कंगनाकडून टीकास्त्रं सुरुचं आहे. कंगनाविरोधात विधीमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कंगनाविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here