Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; औरंगाबादहून एअर एम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

mla-sanjay-shirsat-shivsena-balasahbanchi-suffered-a-heart-attack-news-update-today
mla-sanjay-shirsat-shivsena-balasahbanchi-suffered-a-heart-attack-news-update-today

औरंगाबाद : शिवसेना (बाळासाहेब ठाकरेंची) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर एम्ब्युलन्सने मुंबईला लिलावती रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. काल (सोमवारी) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर एम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी संजय शिरसाट आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here