औरंगाबादेतील राड्यावरून संजय राऊतांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र; म्हणाले,सरकारलाच दंगली घडवायच्या…”

Shivsena-mp-sanjay-raut-reaction-on-dcm-devendra-fadnavis-over-aurangabad-awaladi-statement-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-reaction-on-dcm-devendra-fadnavis-over-aurangabad-awaladi-statement-news-update-today

मुंबई: छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास राडा झालयाची घटना घडली. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या राड्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकावर टीकास्र सोडलं आहे. या घटनेला शिंदे-फडणवीस सरकार (shinde fadnavis Government) जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

 काय म्हणाले संजय राऊत?

“राज्यात अशांतता निर्माण करणं, हा या सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत.

राज्यात अशांतता निर्माण करणं, हा शिंदे सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने नाराजी दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे सरकारचं अपयश आहे. राज्यात असं वातावरण निर्माण व्हावं, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“मविआच्या सभांवर काहीही परिणाम होणार नाही”

दोन एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे. या घटनेमुळे या सभेवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता, “याचा आमच्या सभेवर काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीची प्रत्येक सभा दणक्यात होईल. शिवसेनेच्या सभाही दणक्यात होतील” , असे ते म्हणाले.

 “महाराष्ट्रात जातीय तणाव वाढावा, यासाठी प्रयत्न सुरूये”

दरम्यान, काल विद्वेषयुक्त भाषणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले नसल्याचा आरोप करत महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणांविरोधात दाखल अवमान याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यावरूनही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. “सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला नपुंसक म्हटलं आहे. यापूर्वी न्यायालयाने कधीही कोणत्याही सरकारविरोधात असा शब्द वापरला नाही. आम्ही सातत्याने म्हणतो आहे, की राज्यात सरकारच अस्थित्वात नाही. मुख्यमंत्री रोज गुलाम असल्याची जाणीव करून देत आहेत. महाराष्ट्रात जातीय तणाव वाढावा, यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहेत”, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here