गृहमंत्र्यांकडून भाजप खासदार उन्मेश पाटलांविरुध्द चौकशीचे आदेश; भाजपच्या अडचणीत वाढ

माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला प्रकरण

anil-deshmukh-first-reaction-after-coming-out-jail-in-ed-and-cbi-money-laundering-case-news-update
anil-deshmukh-first-reaction-after-coming-out-jail-in-ed-and-cbi-money-laundering-case-news-update

मुंबई : राज्यात फडणवीस सरकारच्या काळात भाजपाच्या तत्कालिन आमदारानं एका जवानाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात भाजपाचे तत्कालिन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि इतरांच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे ठाकरे सरकारला भाजपाने टार्गेट केलेलं असताना भाजपाला एका जुन्या प्रकरणावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, “२०१६ मध्ये भाजपचे तत्कालिन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. राज्यात भाजप सरकार असल्यामुळे महाजन यांना न्याय मिळाला नव्हता. मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,” असं अनिल देशमुख म्हणाले.

२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता.तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही.यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here