मुंबई: मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉककाळात काही लोकल फेऱ्या बंद राहणार असून उर्वरित लोकल फेऱ्या पर्यायी मार्गाने सुरू राहणार आहेत. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
ब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत
सीएसएमटी/वडाळा रोडवरून पनवेल-वाशीसाठी सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या मार्गावरील अप-डाउन फेऱ्या बंद राहणार आहे.
ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष फेऱ्या चालविल्या जातील. मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकातील लोकल सुरू राहणार आहेत.
हेही वाचा:
India vs England l पहिल्या दिवशी भारताचा स्कोर 300/6; रोहित @161, कोहली-शुभम शून्यावर बाद
महबूबा का आरोप: फर्जी मुठभेड़ में मारे गए व्यक्ति के परिवार से मिली तो नजरबंद कर दिया
India vs England : हिटमैन रोहित शर्माची दमदार सेंच्युरी
अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे!
Petrol-Diesel Price:5वें दिन पेट्रोल डीजल हुआ महंगा, 100 रु लीटर के करीब, जानें अपने शहर का भाव























































































































































































