Bihar Election Result 2020 l तेजप्रताप यादव जिंकले, सासरे चंद्रिका राय हरले

RJD leader Tejpratap Yadav won while JDU leader Chandrika Rai lost
RJD leader Tejpratap Yadav won while JDU leader Chandrika Rai lost

पाटणा l बिहारमध्ये सध्या एनडीए आणि महाआघाडीमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे. RJDचे नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव Tejpratap Yadav हसनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले. मात्र, त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या JDUचे उमेदवार आणि तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय Chandrika Rai हरले. याची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून तेजप्रताप यादव हे सकाळी पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. तेजप्रताप यांच्या विरोधात JDUचे राजकुमार राय यांनी निवडणूक लढवली. पण अखेर राय यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.

सारण जिल्ह्यातील परसा या मतदारसंघातून चंद्रिका राय JDUकडून निवडणूक लढवत होते. RJDच्या छोटे लाल राय यांनी चंद्रिका राय यांचा पराभव केला आहे. चंद्रिका राय हे माजी मुख्यमंत्री दारोगा प्रसाद यांचे पुत्र आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या रायचा विवाह तेजप्रताप यांच्यासोबत झाला होता. पण हे लग्न टिकलं नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यानंतर चंद्रिका राय यांनी RJDला राम-राम ठोकत JDUमध्ये प्रवेश केला होता.

चंद्रिका राय यांचा पराभव हा JDUसाठी मोठा फटका मानला जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राय यांच्या मतदारसंघात प्रचार केला होता. त्याचबरोबर मुलगी ऐश्वर्या रायही वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली होती.

हेही वाचा l Bihar Election Results 2020 l शरद पवार तेजस्वी यादव बद्दल म्हणालेत…

चंद्रिका राय यांनी प्रचारादरम्यान लालू प्रसाद यादव आणि तेजप्रताप यादव यांच्याविरोधात जोरदार हल्ला चढवला होता. चंद्रिका राय हे 6 वेळा आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यात भाजपचे राजीव प्रताप रुडी यांनी त्यांचा पराभव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here