अपयशाचं खापर देवावर फोडणं हे कसलं हिंदुत्व?; शिवसेनेचा भाजपला सवाल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा

shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update
shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update

मुंबई : सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व? अशा शब्दांत शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. “कोरोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे,” या विधानामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ या सदरातून सीतारामन यांच्या विधानावरून सवाल उपस्थित केले आहे.

राऊत म्हणाले, नोटाबंदी ते लॉकडाउन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था मरुन पडली आहे. मात्र, याचं खापर सीतारामन यांनी थेट देवावरच फोडलं. त्यामुळं सरकार यात काय करणार? अशी भूमिका मांडणारं हे सरकार टोकाचं देवभोळं आणि धर्माधिष्ठित असल्याचा हा परिणाम आहे. हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. कारण, देवानचं कोरोनाचं संकट आणलं असेल तर देवच करोनाग्रस्तांना बरं करेल मग आपण लस तरी का शोधायची? असा सवाल करताना भारताच्या अर्थमंत्र्यांचं हे विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्या देशाला शोभणारं नाही, अशा शब्दांत त्यांनी सीतारामन यांच्यावर टीका केली आहे.

देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?

राऊत यांनी  सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडताना देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? चीनच्या कारवाया देखील देवाचीच करणी आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. ‘राजा तशी प्रजा’ या म्हणीचा संदर्भ देताना बिहारमध्ये कोरोना देवीचं मंदिर उभारल्याचा आणि महाराष्ट्रात बार्शीत कोरोना देवीची स्थापना झाल्याचा दाखला त्यांनी दिला. अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत कोरोना देवीची स्थापना करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल झाला तसाच गुन्हा निर्मला सीतारामन यांच्यावर का दाखल व्हायला नको असंही राऊत म्हणाले.

लॉकडाउनमुळे रोजगार गेलेल्या जनतेला ब्राझिल सरकारने मदत केली

लॉकडाउनमुळे रोजगार गेलेल्या जनतेला ब्राझिल सरकारने जी मदत केली त्याची आठवण यावेळी संजय राउत यांनी केंद्र सरकारला करुन दिली. ब्राझिलच्या सरकारने कोविडच्या काळात आपल्या नागरिकांना मदत म्हणून थेट बँकेत रक्कम हस्तांतरीत केली. त्याप्रमाणे आपल्या सरकारंनही काम करणं अपेक्षित असून ही देवाची करणी वैगरे नसून माणसांवर आलेलं संकट आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक आधार देणे हे सरकारचे काम असल्याचं राऊत यांनी त्यांच्या रोखठोकमध्ये स्पष्टपणे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here