एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष

pawar-on-reports-of-bjp-leader-eknath-khadse-joining-ncp
pawar-on-reports-of-bjp-leader-eknath-khadse-joining-ncp

पुणे l  भाजपाचे ज्येष्ठ नेते  मात्री एकनाथ खडसे भाजपाला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 17 तारखेला प्रवेश करणार आहेत. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते विधान भवन येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये.

भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. खडसेंबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.

 वाचा l Samsung चा बिग सेल, स्मार्टफोन्ससह अनेक प्रॉडक्टवर बंपर ऑफर्स

राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आपल्या व्हॉटसअॅपला तसे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ते बरेच दिवस मुंबईत ठाण मांडून बसले होते. त्यामुळे खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईतील बैठकीलाही एकनाथ खडसे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले होते.

यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्नही केला होता. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये जाऊन आमच्या दोन थोबाडीत द्याव्यात. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर जाऊन नाराजी व्यक्त करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

वाचा lFlipkart Big Billion Day लॅपटॉप,टीव्ही,कपडे,फर्निचरसह इतर वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स

दरम्यान, भाजपच्या गोटातून सध्या एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जामनेर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनसाठी आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, यासाठी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना फोनही केला होता.

परंतु, खडसे यांनी वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे गिरीश महाजन यांना कळवले. देवेंद्र फडणवीस हाकेच्या अंतरावर येऊनही खडसे यांनी त्यांची भेट टाळल्याने त्यांचा पक्षांतराचा निर्णय निश्चित झाल्याच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया जळगावात बोलताना दिली होती.

देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसेंच्या पक्षांतरासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, “एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगलं कळतं. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे”.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here