घंटा बडवली,शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नव्हे;संजय राऊतांचा भाजपाला टोला

sanjay-raut-allegation-on-bjp-mla-rahul-kul-bhima-sugar-factory-wrote-letter-to-devendra-fadnavis-criticized-ex-bjp-mp-kirit-somaiya-news-update-today
sanjay-raut-allegation-on-bjp-mla-rahul-kul-bhima-sugar-factory-wrote-letter-to-devendra-fadnavis-criticized-ex-bjp-mp-kirit-somaiya-news-update-today

पुणे l घंटा बडवली,शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नव्हे. आम्हीही हिंदूच आहोत. आमचं हिंदुत्व राजकीय नाही. भाजपवाल्यांनी संघाकडून हिंदुत्व शिकावे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. संजय राऊत Sanjay Raut आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोदींनीही लक्ष घालावं, यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे हा प्रश्न घेऊन जावा, आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ. चंद्रकांत पाटलाचे सरकार राहिले नाही, तर त्यांना पण अभ्यास करता आला असता, असा टोलाही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

हेही वाचा l Mumbai police l‘मुंबई पोलीस’ जगातील उत्तम पोलीस दल’;न्यायालयाकडून कौतुकाची थाप

मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. दुर्दैवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांचा राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होतेय, बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलंय, बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही, तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे. एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही.

हेही वाचा l Blue Moon l ‘ब्लू मून’ चा आज योग,पाहा रात्री ८.१९ वाजता

मधला काळ हा संकटाचा होता, कोरोनाची लढाई उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केल्याचाही संजय राऊत यांनी उल्लेख केला आहे.