अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लग्नानंतरही घटस्फोट घेण्यास भाग पाडले पण अखेर…

teen-age-girl-raped-many-times-after-marriage-forced-to-divorced-young-arrest-news-update-today
teen-age-girl-raped-many-times-after-marriage-forced-to-divorced-young-arrest-news-update-today

जालना : शेजारच्या खोलीत किरायाने राहण्यासाठी आलेल्या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर अल्पवयीन असल्यापासून अत्याचार सुरू केला, पुढे लग्न झाल्यावर तिला घटस्फोट घेण्यास भाग पडले. नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून प्रियकरावर कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विनायक राठोड (रा. वाढेगाव, ता. मंठा) असे संशयिताचे नाव आहे.

जालना शहरातील समर्थनगर भागातील पिडीत तरुणीची अल्पवयीन असताना घराशेजारी किरायाच्या खोलीत राहणाऱ्या प्रवीण विनायक राठोड (रा. वाढेगाव, ता. मंठा) याच्यासोबत ओळख झाली होती. तेव्हा ती १५ वर्षाची असतानाच प्रवीण राठोड याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून प्रवीण राठोड याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार सतत दोन वर्षे सुरू राहिला.

दरम्यान, पिडीत मुलीच्या पालकांनी तिचे बदनापूर येथील नात्यातील मुलासोबत ता.१६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले होते. मात्र, प्रवीण राठोड याने तिच्या सासरच्या घरासमोरच किरायाने खोली केली. पीडिताचा पती कामानिमित्त बाहेर गेला की प्रियकर प्रवीण राठोड हा तिच्यावर अत्याचार करत असे. त्यातच ता. २१ डिसेंबर २०२२ रोजी पती बाहेर गेला असता प्रवीणने तिला पुणे येथे पळवून नेले होते. पुण्यात लग्नाच्या आमिष दाखवून सात दिवस अत्याचार केला.

या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात पिडीत युवती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल झाली होती. त्यानंतर प्रवीणने पीडिताला जालन्यात आईच्या घरी आणून सोडले होते. पुन्हा त्या पीडिताला तुझ्या पतीसोबत घटस्फोट घे, त्यानंतर आपण कायदेशीर लग्न करू, असे सांगितले. नंतर पुन्हा अंबड रोडवरील मित्राच्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

पीडिताने जालना येथील कौटुंबिक न्यायालयात पतीसोबत घटस्फोट घेतला. मात्र, त्यानंतर प्रवीण राठोडसह त्याचे आई-वडील व अन्य नातेवाइकांनी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत तरुणीने कदीम जालना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रियकर प्रवीण राठोड याच्याविरोधात पोस्को कायद्यासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक मोबाईल पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here