उर्मिला मातोंडकरांचा काँग्रेसकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी नकार; विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

urmila-matondkar-to-join-shiv-sena-on-Monday
urmila-matondkar-to-join-shiv-sena-on-Monday

मुंबई l बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना urmila-matondkar राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवर संधीसाठी काँग्रेसकडून विचारणा करण्यात आली. मात्र उर्मिला मातोंडकरांनी नकार दिला. असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माहिती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेतर्फे संधी दिली जाणार आहे अशी जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेकडून अद्यापही अधिकृतरित्या उर्मिला मातोंडकरांचे नाव जाहीर करण्यात आले नाही. किंवा त्यांच्या नावाबद्दल दुजोराही मिळाला नाही.

काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर urmila-matondkar यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे.’

हेही वाचा l घंटा बडवली,शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नव्हे;संजय राऊतांचा भाजपाला टोला

उर्मिला मातोंडकर urmila-matondkar २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा l Sponge gourd benefits l घोसाळी खाण्याचे गुणकारी फायदे

उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून संधी मिळणार आहे अशी विचारणा शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकरांनी केली असता, संजय राऊत म्हणाले, “यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत”.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here