Tejashwi yadav l…तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको : शिवसेना

Don't be surprised if Tejaswi Yadav becomes Chief Minister: Shiv Sena
Don't be surprised if Tejaswi Yadav becomes Chief Minister: Shiv Sena

पुणे l बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलंय, बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही, तर तेजस्वी यादव Tejashwi yadav मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा l Mumbai police l‘मुंबई पोलीस’ जगातील उत्तम पोलीस दल’;न्यायालयाकडून कौतुकाची थाप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोदींनीही लक्ष घालावं, यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे हा प्रश्न घेऊन जावा, आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ. चंद्रकांत पाटलाचे सरकार राहिले नाही, तर त्यांना पण अभ्यास करता आला असता, असा टोलाही संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे.

दुर्दैवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांचा राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होतेय महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे.

हेही वाचा l Sponge gourd benefits l घोसाळी खाण्याचे गुणकारी फायदे

एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही. मधला काळ हा संकटाचा होता, कोरोनाची लढाई उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केल्याचाही संजय राऊतांनी उल्लेख केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here