आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाहीत; केंद्र सरकार कडून विशेष पॅकेज आणा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांच्या बांधावर; छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

The government has money for the MLAs to be defeated, the Shakti Peeth highway but not for the farmers; Bring a special package from the central government
The government has money for the MLAs to be defeated, the Shakti Peeth highway but not for the farmers; Bring a special package from the central government

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी  पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहेखरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. दसरादिवाळी सण जवळ आले आहेतमुख्यमंत्री फक्त आकडेवारी फेकत आहेतपण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. पैसा कुठून आणायचा हा सरकार प्रश्न आहे पण दसऱ्याच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा कराअसे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Vasantrao Sapkal यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमाकोळीभोडखाजालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. कल्याण काळेछत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकरजालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुखप्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी ही उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या समजून घेतल्या आणि या कठीण प्रसंगी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा धीर दिला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले कीमुख्यमंत्री जे बोलतात तशी कृती करत नाहीतत्यांचे आश्वासन म्हणजे ‘लबाडा घरचे आमंत्रणजेवल्याशिवाय खरे नाही’असे आहे. पावसाने शेतकऱ्यांची शेती वाहून गेलीसंसार उद्ध्वस्त झालेजगण्याची साधने नष्ट झालीतरीही निष्क्रीय फडणवीस सरकार केवळ मौन बाळगून बसले आहे. सरकार बांधावर आले आणि फोटो काढून परत गेले पण शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. उलट मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री व मंत्री यांची विधाने तळपायाची आग मस्तकात जावी अशी आहेत. शेतकरी सरकारला प्रश्न विचारत असताना पैसे कुठून आणूपैसे खिशात घेऊन फिरतो काराजकारण करू नकोअशा धमक्या देत आहेत. शेतकरी व नागरिक रस्त्यावर आले आहेतनिसर्गाने त्यांचे सर्व काही लुटले आहे अशावेळी जनतेचा आक्रोश जर सरकारला समजत नसेल तर ते असंवेदनशिल सरकार आहे. महायुती सरकारची भाषा अहंकारी व लाजीरवाणी आहेअसेही सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले कीअदानीसाठी सरकारकडे पैसे आहेत. आमदारखासदार फोडण्यासाठी पैसे आहेत५५ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गासाठी पैसा आहेगरज नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गासाठी पैसा आहे आणि शेतकऱ्यांना द्यायचे म्हटले की पैसा नाही हे रडगाणे काय गाताअसा सवाल करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसाठी विशेष पॅकेज घेऊन यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here