Bhiwandi building collapse: भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा जणांचा मृत्यू

25 जणांना सुखरुप बाहेर काढले, 50 जण अडकल्याची भीती

bhiwandi- thane- building-collapse-incident-10persons -death
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 ठार bhiwandi- thane- building-collapse-incident-10persons -death

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये आज सोमवारी पहाटे तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. 50 जण अडकल्याची शक्यता आहे. ही घटना पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. (bhiwandi-building-collapse-incident-many-death)

४३ वर्ष जुनी होती इमारत

 भिवंडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील 40 फ्लॅट्समध्ये 150 रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती. असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महाड येथील पाच मजली इमारत दुर्घटना ताजी असताना भिवंडीमध्ये इमारत कोसळली. या घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. सगळे नागरिक झोपेत असताना ही घटना घडल्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

इमारत दुर्घटनेनंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, परिसरातील सर्तक नागरिकांमुळे 25 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

आतापर्यंत सुखरूप बाहेर काढलेल्या व्यक्तीची नावे

१) मोबिन शेख( पु/४५वर्ष)
२) हैदर सलमानी( पु/२०वर्ष)
३) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
४) मोहम्मद अली(६०/वर्ष)
५) शबीर खुरेशी(३०/वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे

१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२) फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३) आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४) बब्बू(पु/२७वर्ष) इतर मृतांची नावे

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here