दिल्लीत भडका : इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला, कृषी विधेयक आंदोलनाला हिंसक वळण

tractor-set-on-fire-at-india-gate-in-new delhi-during-protest-against-farm-bills
दिल्लीत भडका : इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला, कृषी विधेयक आंदोलनाला हिंसक वळण tractor-set-on-fire-at-india-gate-in-new delhi-during-protest-against-farm-bills

नवी दिल्ली : कृषी विधेयकावरुन (agriculture law) सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. (tractor-set-on-fire-at-india-gate-in-new delhi-during-protest-against-farm-bills ) केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात आंदोलन सुरु आहे.

नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना (agriculture law) विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकावर रविवारी सही केली त्यामुळे त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले. देशभरात शेतकरी संघटना या ह्या कायद्याविरोधात आहेत. दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.

 आज सोमवारी  सकाळी सात वाजून ४२ मिनिटांनी आंदोलकांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

“इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून तपास सुरु आहे” असे नवी दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले.

कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने एनडीएत फूट पडली. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता. “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे” अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here