ShivSena Dasara Melava 2022 : दसरा मेळावा शिवतीर्थावरच, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आदेश

Uddhav Thackeray's press conference at 5 pm,
Uddhav Thackeray's press conference at 5 pm,

मुंबई: शिवसेनेच्या (ShivSena) मुंबईतील विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. दसरा मेळाव्यावरुन (ShivSena Dasara Melava 2022) शिवसेना आणि शिंदे गटामध्ये (Shinde Group) चुरस आहे. शिवतीर्थावर मेळावा कोण घेणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दोन्ही गटाच्यावतीनं महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

 उद्धव ठाकरे बैठकीत काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत बंडखोरांवरती टीका केली आहे. ”फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे, सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा” असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख सोबत असल्याने आत्मविश्वास दुणावला असल्याचे ठाकरे म्हणाले. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांना सोबत घ्या, मोठ्या प्रमाणात शिवतीर्थवर गर्दी जमवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. मनात कोणताही संभ्रम ठेवू नका, उद्धव ठाकरे यांची विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांना सूचना दिली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडूनही मेळावा घेण्यासाठी तयारी सुरु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही शिंदेंकडे मेळावा घेण्याबाबत मागणी केली आहे. शिंदे गटाकडून शिवतीर्थ तसेच इतर मैदानांचीही चाचपणी केली जात आहे. एकनाथ शिंदेंसोबत सध्या ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. तसेच अनेक माजी आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्राला दोन दसरा मेळावे पाहायला मिळतात का? याचं उत्तर आगामी काळात मिळू शकतं.

हेही वाचा: अजित पवार म्हणतात, “काही आमदार म्हणतात गिन गिन के, चुन चुन के मारेंगे.. बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का?…!”

दरम्यान एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासून ते उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टीला आव्हान देत आहेत. शिवसेनेपासून ४० आमदार आणि १२ खासदार वेगळे झाल्यापासून शिंदे आणि त्यांचा गट शिवसेना आमचीच म्हणत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यावरतीही शिंदेंनी दावा केला आहे. कारण दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख शिवसैनिकांना संबोधित करत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here